महाराष्ट्रात कोसळधार! आज जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

जुलै 22, 2024 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । राज्यात मान्सून पुन्हा पूर्णपणे सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, आज म्हणजेच सोमवारी देखील राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rainalert 1 jpg webp

आज कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट
हवामान विभागाचा आज पुण्यासह मुंबईमधील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि भंडारा येथे रेड अलर्ट आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच आसापासच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now