⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

रेल्वेने ‘या’ 23 गाड्या केल्या रद्द, भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागू शकतो. कारण छत्तीसगडहून निघणाऱ्या 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी, येथे यादी तपासा. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागांमध्ये अपग्रेडेशनचे काम सुरू आहे, त्यामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द केलेल्या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
(१) ट्रेन क्रमांक १८२३७ कोरबा-अमृतसर एक्सप्रेस २४ एप्रिल ते २३ मे २०२२ पर्यंत कोरबा स्थानकावरून रद्द राहील.
(२) ट्रेन क्रमांक १८२३८ अमृतसर बिलासपूर एक्सप्रेस २४ एप्रिल २०२२ ते 23 मे २०२२ पर्यंत अमृतसरहून रद्द राहील.
(३) ट्रेन क्र. १२७७१ सिकंदराबाद रायपूर त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेस २५, २७, २९ एप्रिल, २, ४, ६, ९, ११, १३, १६, १८, २०, २२, २९ मे रोजी सिकंदराबादहून रद्द राहील.
(४) ट्रेन क्रमांक १२७७२ रायपूर सिकंदराबाद त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस २६, २८, ३० एप्रिल आणि ०३, ०५, ०७, १०, १२, १४, १७, १९, २१, २४ मे रोजी रायपूरहून रद्द राहील.
(५) ट्रेन क्र. १२८८० भुवनेश्वर LTT द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस भुवनेश्वरहून २५, २८ एप्रिल आणि २, ५, १२, १६, १९, २३ मे रोजी रद्द राहील.
(६) ट्रेन क्रमांक १२८७९ LTT भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस LTT वरून २७, २९ एप्रिल आणि ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मे रोजी रद्द राहील.
(७) ट्रेन क्रमांक २२८६६ पुरी एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस २६ एप्रिल आणि ३, १० मे १७ रोजी पुरीहून रद्द राहील.
(8) ट्रेन क्रमांक २२८६५ LTT पुरी साप्ताहिक एक्सप्रेस 28 एप्रिल आणि 5,12,19 मे रोजी LTT वरून रद्द राहील.
(९) ट्रेन क्र. १२८१२ हटिया एलटीटी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस २९, ३० एप्रिल, ६,७,१३, १४, २०, २१ मे रोजी रद्द राहील.
(१०) ट्रेन क्र. १२८११ LTT हटिया द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस LTT वरून ०१, ०२, ०८, ०९, १५, १६, २२, २३ मे रोजी रद्द राहील.
(११) ट्रेन क्रमांक 22847 विशाखापट्टणम LTT साप्ताहिक एक्सप्रेस विशाखापट्टणम येथून 01, 3, 8, 10, 15, 17, 22, 24 मे रोजी रद्द राहील.
(१२) ट्रेन क्रमांक 22848 LTT विशाखापट्टणम साप्ताहिक एक्सप्रेस 3,10,17,24 मे रोजी LTT वरून रद्द राहील.
(१३) ट्रेन क्रमांक 20843 बिलासपूर – भगत की कोठी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 25, 26 एप्रिल आणि 2, 3, 9, 10, 16, 17, 23 मे रोजी बिलासपूरहून रद्द राहील.