जळगाव जिल्हा

रेल्वे होणार अपडेट : १४ ते २१ नोव्हेंबर ‘या’ वेळेत ऑनलाईन तिकीट बुकिंग बंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । रेल्वे प्रशासनाने नवीन रेल्वेची माहिती आणि अन्य डेटा अपग्रेड करण्यासाठी दि.१४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ठराविक वेळेत ऑनलाइन तिकीट बुकिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ११.३० ते पहाटे ५.३० पावेतो बुकिंग बंद राहणार असल्याची माहिती क्षेत्रीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी दिली आहे.

१४ नोव्हेंबरपासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत रात्री ऑनलाईन टिकीट बुक होणार नाही. रेल्वे आपल्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमला अपग्रेड करत आहे. त्यामुळे प्रवाशांना काही काळ रात्री टिकीट बुक करण्याच्या सुविधेपासून मुकावे लागणार आहे. नवीन रेल्वेंची संख्या आणि अन्य डेटाला अपग्रेड करण्यासाठी हा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. प्रवाशी रात्री ११.३० पासून पहाटे ५.३० वाजेपर्यंत ऑनलाईन प्रणालीनं टिकीट बुक करू शकणार नाही.

भारतीय रेल्वेनं दिलेल्या पत्रात सांगितलं आहे की, नवीन रेल्वे गाड्यांची संख्या आणि जुन्या गाड्यांची आसन क्षमता याला अपग्रेड करणाऱ्यासाठी काही काळ रात्रीची बुकिंग बंद करण्यात आली आहे. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, अपग्रेडची ही प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून २० ते २१ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत PRS सिस्टीम बंद राहणार आहे. यात सहा तासाच्या दरम्यान तिकीट रिझर्वेशन, तिकीट रद्द आणि गाड्यांविषयीची माहिती अशा सर्व सेवा बंद राहणार आहे. मात्र १३९ या क्रमाकांवर प्रवाशी रेल्वेसंबंधी विचारपूस करू शकता.

कोरोनामुळे अनेक गाड्यांचे नाव बदलून स्पेशल रेल्वेगाड्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तिकीट दरवाढही करण्यात आली होती. मात्र आता सिस्टीम अपग्रेड केल्यानंतर स्पेशल गाड्या आता पूर्वीच्या नावाप्रमाणेच सुरू केल्या जाणार आहेत. सोबतच तिकीट दर देखील जुनेच असणार आहेत. रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, कोरोना काळात स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या रद्द करून सामान्य रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे तिकीट दरात सुमारे ३० टक्के घट होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button