सप्ताहाभर विविध उपक्रमांचे आयोजन ; १५ ऑगस्टला रॅली होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी रॅगींग प्रतिबंध दिनानिमीत्त दि. १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत राबविल्या जाणार्या सप्ताहास सुरूवात झाली आहे. या सप्ताहांतर्गत रॅगींगसंदर्भाती जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी रॅगींग प्रतिबंध दिनानिमीत्त जनजागृतपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅन्टी रॅगींग कमिटीचे चेअरमन तथा डिन डॉ. प्रशांत सोळंके हे होते. तर व्यासपीठावर वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. विलास चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वसतिगृहाचे रेक्टर सुरेंद्र गावंडे, अर्चना भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अॅन्टी रॅगींग कमिटीचे निमंत्रक प्रा. बापूराव बिटे यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून रॅगींग संदर्भातील कायदे, नियम याबाबतचा आढावा सादर केला.
याप्रसंगी वैद्यकीय संचालक डॉ. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, मानसोपचार तज्ञ डॉ. विलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कमिटीचे चेअरमन तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी अॅन्टी रॅगींग सप्ताहांतर्गत राबविल्या जाणार्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तसेच राज्यात अनेक महाविद्यालय बघितले असून आपल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींगबाबत असलेली जागरूकता ही इतर कुठेही दिसून आली नाही असे गौरवोद्गार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. बिटे यांनी नशा मुक्त भारत अभियानाबाबतही माहिती दिली. तसेच अॅन्टी रॅगींग सप्ताहांतर्गत दि. १३ रोजी सेमिनार, दि. १४ रोजी स्लोगन स्पर्धा, दि. १५ रोजी जनजागृती रॅली, दि. १६ रोजी शॉर्ट फिल्म, दि. १७ रोजी पोस्टर स्पर्धा, दि. १८ रोजी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मान्यवरांचे आभारही मानले.