⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जिल्ह्यातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठीत!

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची जळगाव, यावल वनविभागाच्या सामाजिक वनीकरण दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था पाल व वन्यजीव विभाग नाशिक यांची जळगाव जिल्हा वन कर्मचारी संघटनाची जिल्हा कार्यकारणी दि. ३० सप्टेंबर 2022 रोजी धुळे ज़िल्हा वन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील, सचिव जितेंद्र चव्हाण, कोष अध्यक्ष देवेंद्र बच्छाव, व जळगाव – यावल वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थित घोषित करून सुधीर खैरनार रावसाहेब, महेश फुलझाडे रावसाहेब, राजेंद्र चौधरी रावसाहेब यांचे मार्गदर्शना नुसार कार्यकारणी गठीत करून पदाधिकार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

जळगाव जिल्ह्याच्या वनविभाग वन्यजीव यांची जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष प्रकाश सिताराम पाटील, उपाध्यक्ष, विनायक पांडुरंग पाटील, सचिव जगदिश ताराचंद सपकाळे, उपसचिव चंद्रशेखर माणिक होळगीर, कोषाध्यक्ष भास्कर भिमराव कोळी,सह कोषाध्यक्ष दादा आनंदा पवार, सदस्य विशाल माणिक अहिरे,सदस्य नितीन मनोहर मुरेकर, महिला संघटक स्वाती प्रल्हाद साळुंखे,सदस्य जया तोताराम बि-हाळे, सदस्य तनुजा तडवी, जिल्हा कार्यकारिणीचे मार्गदर्शक हिरामण बन्सी राठोड मुख्य लेखापाल, राजेंद्र अहिर मुख्य लेखापाल, अनिल सुपडु गोराणे मुख्य लेखापाल, कैलास शांताराम सावदेकर लेखापाल, सुरेश इश्वरलाल सरोदे लेखापाल आदी सह कर्मचारी उपस्थित होते.