⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

युद्धामुळे दागिने महागले; आगामी दोन दिवसात सोने-चांदी गाठणार मोठा टप्पा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । सुमारे दोन वर्षांपासून युक्रेन-रशिया युद्धामुळे सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीने विक्रमी दर गाठला होता. आता पुन्हा इस्त्राईल-हमास यांच्यात युद्ध सुरु असून याचे पडसाद दोन्ही मौल्यवान धातूंवर होताना दिसून येत आहे. बाजाराच्या पहिल्याच दिवशी काल सोन्याच्या किमतीत ६०० रुपयांची वाढ दिसून आली. दुसरीकडे चांदीच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ दिसून आली.

जळगावमधील सोने-चांदीचे दर?
गेल्या सप्टेंबर महिन्यात ५९ हजार रुपये प्रति तोळ्यावर असलेला सोन्याचा दर ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात घसरून ५७,५०० या निच्चांकी दरपर्यंत खाली आले होते चांदीचा दर देखील ६८ हजारांवर आला होता. मात्र आता इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धामुळे दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६०० रुपयावर आला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,५०० रुपयांवर विकला जात आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ७०,००० रुपयावर आहे.

दरम्यान, आगामी दोन तीन दिवसात दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोने ६०,५०० रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. तर चांदीचा दर ७५००० हजार रुपयांवर जाईल, असंही त्यांचं म्हणणं आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
काल सोमवारी सराफा बाजारात चमक कायम राहिल्याने सोन्या-चांदीचे भाव वधारले. मात्र आज मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात घसरण झाली. बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी उसळी आली आहे. MCX वर, सोने 0.24 टक्के म्हणजेच 140 रुपयांच्या वाढीसह 57,712 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव 0.38 टक्क्यांनी घसरून 265 रुपयांनी 68,829 रुपये प्रति किलो झाला आहे.