जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । आसोदा रेल्वेगेटवरील दुरुस्तीसाठी या मार्गावरील वाहतूक रविवार व सोमवार रोजी बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक प्रजापतीनगर मार्गे वळवण्यात आली आहे. तसा फलक रेल्वेगेटवर लावला आहे.

शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी व रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत हे रेल्वेगेट बंद राहणार आहे. वर्षभरात आठव्यादा हे रेल्वेगेट किरकोळ दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. रात्री अथवा अधिक मनुष्यबळ लावून काही तासात काम करणे शक्य आहे; मात्र याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रात्री अथवा कमी वेळेत काम पूर्ण करावे अशी मागणीही आता नागरीकांतून केली जाते आहे.

हे देखील वाचा :
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद






