गुन्हेजळगाव शहर

जळगावात हॉटेलवर छापा, हॉटेल मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२१ । शहरातील खेडी परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये रात्री ९ वाजता विना परवाना ग्राहकांना बसवुन मद्य विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना कारवाईचे ७ हजारांचे मद्य मिळून आले असून हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारतर्फे पोलीस कर्मचारी सुधीर साळवे यांनी फिर्यादी दिली आहे. गुरुवारी पोलीस कर्मचारी अतुल पंजारी, ईमरान सैयद,  गोविंदा पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळसकर असे पोस्टेला हजर असतांना पोलीस निरीक्षक  प्रताप शिकारे यांनी त्यांच्या दालनात बोलागून कळविले की, गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असून गोदावरी कॉलेज जवळ भुसावळ रोड वर हॉटेल जस्ट चील येथे मालक सचीन पांडुरंग मराठे रा.खेडी आणि मॅनेजर योगेश हरीभाऊ कर्डीले असे ईसम हे त्यांच्या हॉटेलला विनापास परवाना विदेशी दारू बाळगुन हॉटेलमध्ये लोकांना टेबल उपलब्ध करून दारु विक्रि करीत असून सदर ठिकाणी जावून कार्यवाही करायची असे कळविले.

पोलीस पथक लागलीच पंचासह सरकारी वाहनाने रवाना झाले. मिळालेल्या बातमीनुसार गोदावरी कॉलेज जवळ हॉटेल जस्ट चील येथे रात्री ९ वाजता पाहणी केली असता आम्हास दोन ईसम हे काउंटरवर बसलेले होते तर काही इसम टेबलावर जेवण करताना मिळुन आले व एक ईसम हा त्यांना दारु देतांना मिळुन आला.

पथकाने पंचासमक्ष हॉटल काउंटरवर बसलेल्या इसमांना त्याचे नांव, गांव विचारता त्यांनी आपले नांव हॉटेल मालक सचीन पांडुरंग मराठे वय-४० वर्ष रा.प्लॉट नंबर ५, शेखर निवास सुदर्शन कॉलनी खेडी बु. जळगांव, मॅनेजर योगेश हरीभाऊ कर्डीले वय २३ वर्ष रा.सुप्रीम कॉलनी जळगांव असे असल्याचे सांगीतले. पंचासमक्ष हॉटेलची पाहणी केली असता काऊंटरच्या खाली तीन विदेशी दारूचे खोके मिळुन आले. 

पथकाने कारवाईत विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button