---Advertisement---
गुन्हे चोपडा

चोपड्यात कुंटणखान्यावर छापा : २३ तरुणींची सुटका, ११ महिलांवर गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । चोपडा शहरालगत असलेला कुंटणखाना काही महिन्यांपूर्वी उध्वस्त करण्यात आला होता. बुधवारी सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर छापा टाकला. पोलिसांनी तब्बल २३ पीडित तरूणींची सुटका केली असून याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kuntankhana jpg webp

चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक रावले यांच्या माहितीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. कुंटणखान्यात पोलिसांना मिळून आलेल्या जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल २३ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

---Advertisement---

पोलिसांनी तरुणींची सुटका केल्यानंतर याप्रकरणी कुंटनखाना चालविणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले. या परीसरात मध्यप्रदेश, आंध्रा, पश्चिम बंगाल, कलकत्तासह नेपाळमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार केल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देहव्यापार केला जात आहेत. चोपडा प्रमाणेच भुसावळ आणि जळगावात देखील कारवाईची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---