जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । सावदा येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दि.३० एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकी व चारचाकी कार भीषण अपघात झाला. यात दुचाकी वरील दोघे जागीच ठार झाले. वीरेंद्र सुनील नेमाडे (वय २७) व अनिल चुडामन मेढे (वय ६५) दोघे चिनावल (ता. रावेर) असे अपघातातील मृतांचे नाव आहे.
सावदा-पाल महामार्गावरकोचूर रस्त्यावर हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस (एम.एच १९ एबी ११०१) व होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी.आर. व्ही.एमएच १९ डी एम०३५१ या गाडीचा अपघात जबरदस्त झाला. यात दुचाकीस्वार दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कार चालक एअर बॅगमुळे बचावले असून किरकोळ जखमी झाले आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करता संबंधित दवाखान्यात रवाना केले.यावेळी मृतांच्या प्रतिष्ठांनी टाहो फोडला.सदरील भिषण अपघाताची फिर्याद महेंद्र हेमंत नेमाडे हे सावदा पोलिस ठाण्यात नोंदवित असल्याची कारवाई सुरू आहे.