⁠ 
सोमवार, मे 27, 2024

Raver : लाच प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा, संशयित आरोपी पसार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । बँकेतून कर्ज काढण्यासाठी शासकीय कागदपत्रे मिळवून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागणाऱ्या रावेर तालुक्यातील विवरा ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे याच्यावर निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नसून तो पसार झाला आहे.

याबाबत असे की, तक्रारदार हे रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावातील रहिवाशी असून त्यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी शासकीय कागदपत्रे हवे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर 8, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून देण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. परंतू शायकीय कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यात ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रुपये लाच मागितली होती व त्याचदिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत आरोपीने ५ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले.

मात्र आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात मंगळवारी ३० एप्रिल रोजी निंभोरा पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी हा पसार झाला आहे.