⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कुतुबमिनार म्हणजेच विष्णुस्तंभ ? आज न्यायालयात महत्वाच्या विषयावर सुनावणी

जळगाव लाईव्ह न्युज | २४ मे २०२२ | कुतुबमिनार म्हणजे विष्णुस्तंभ आहे आणि या परिसरात शिव, गणेश, सूर्य, देवी गौरी यांच्यासह काही जैन मंदिरं होती, असा दावा करण्यात येत आहे. 27 हिंदू आणि जैन मंदिरांना उद्ध्वस्त करुन त्याच सामग्रीतून मशिद उभारण्यात आली, असाही दावा केला जात आहे. या वादावर कोर्टात आज सकाळी सुनावणी होणार आहे. हि सुनानावणी दिल्लीच्या साकेत कोर्टात होणार आहे. ही याचिका वकील हरि शंकर जैन आणि वकील रंजना अग्निहोत्री यांच्यावतीने दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत दावा करण्यात आला आहे कि, कुतुब मीनार परिसरात हिंदू देवी देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. याशिवाय कुतुबमिनार परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे कलश, स्वस्तिक आणि कमळ यांसारखी प्रतिकं दिसतात, ज्यावरुन ही इमारतमधील हिंदूंचं अस्तित्त्व अधोरेखित करतं.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग अर्थात एएसआयचा दाखल देत याचिकेत म्हटलं आहे की, कुतुबमिनार परिसरात असे शिलालेख आहे ज्यावरुन सिद्ध होतं की तिथे 27 हिंदू आणि जैन मंदिरं उद्ध्वस्त करुन त्याच सामग्रीचा वापर करुन परिसराच्या आत कुव्वत-उल-इस्लाम मशिद बांधण्यात आली आहे.