जळगावच्या लेखकांचे क्रीडा विषयक पुस्तकाचे हरियाणा राष्ट्रीय स्पर्धेत प्रकाशन!
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यातील तरुण लेखक योगेश चौधरी व तेजस पाटील यांचे हरिद्वार येथे ९ व्या नॅशनल स्टुडंट्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रीडा विषयक पुस्तकाचे प्रकाशन संपन्न. या स्पर्धेचे उद्घाटन उत्तराखंड येथील मा. कॅबिनेट मंत्री तथा स्टुडंट्स ऑलिम्पिक उत्तराखंड राज्य अध्यक्ष स्वामी येतेश्वरानंद जी महाराज यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जळगाव जिल्हा सचिव योगेश चौधरी व जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी तयार केलेल्या क्रीडा विषयक माहिती पुस्तकाचे व जळगाव जिल्हा अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वनार, राष्ट्रीय महासचिव डॉ. प्रदीप भारद्वाज, महाराष्ट्र राज्य महासचिव सुनील शिंदे, जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा सचिव योगेश चौधरी आदी सहकारी उपस्थित होते.
या पुस्तकात खेळाडूंना व प्रशिक्षकांसाठी खूप उपयुक्त अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जळगाव जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे त्या टीमने खेळाडूंसाठी असे आगळे वेगळे महत्वपूर्ण असे पुस्तक तयार केले आहे. लवकरच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे असे जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या तरुण लेखकांचे संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे.