पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न ; ४६ उमेदवारांची अंतिम निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून “पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन पदवी प्रदान सभागृह, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड हे उपस्थित होते.
या मेळाव्या करिता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथील उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवला होता तसेब उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक, जळगाव, गोविंदा एचआर सर्विसेस नाशिक हिताची इष्टिमो ब्रेक सिस्टीम्स जळगाव स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स किरण मशीन टूल्स डाटा मेटिक ग्लोबल सर्विसेस इत्यादी ३५ आस्थापनांनी २१०० पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित केली होती, मेळाव्याला ऑनलाईन नोंदणी केलेले १९४४ केलेली होती व ऑफलाईन नोंदणी केलेले ७४१ उमेदवार उपस्थित होते त्यापैकी एकुण १२७४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी एकुण ३९५ उमेदवारांची प्राथमिक निवड तसेच ४६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री संदीप गायकवाड सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यानी रोजगार मेळाव्याचा उद्देश व उपलब्ध रिक्त पदांबाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. मेळाव्यामध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय रिसताताई वाघ यांनी केले. याप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी यानी मेळाव्याच्या आयोजनामागील विद्यापीठाची भूमिका तसेच अशाच प्रकारचे मेळावे धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या