महापालिका शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या ! : सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या, यासाठी पालकांच्या बैठका घ्या. क्रीडा विषयात आवड असलेल्या विद्यार्थ्यांना वाव द्या. विद्यार्थांना संगणकाचे ज्ञान द्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, अशाच क्रीडा, कला, स्पर्धेचे आयोजन करा व पटसंख्या वाढविण्यसाठी प्रयत्न करा, असे आदेश महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठकीत दिले.

यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. बैठकीस शाळेतील प्रशासन अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते. शाळेत शिस्त लावण्यासाठी शिक्षकांनी वेळेवर येणे गरजेचे आहे. यापुढे वेळेवर न येणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करण्यात येईल. शहरात असलेल्या आजारांना लक्षात घेता, शाळेत सर्वत्र स्वच्छता ठेवा. शाळेतील दरवाचे, खिडक्या दुरुस्त करून घ्या. विद्यार्थांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार द्या. त्याचा दर्जा स्वतः शिक्षकांनी तपासा, शुद्ध पाणी महापालिका शिक्षण विभागाचे द्या. विद्यार्थ्यांची काळजी घ्या, अशा सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे सूचनाही आयुक्त गोराणे यांनी दिल्या.

शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्तपदे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत सहाय्यक आयुक्त गोराणे यानी सांगितले, की ज्या शाळांमध्ये शिक्षकांचे पद रिक्त असेल, त्याची माहिती एकत्र करून ती लवकर सादर करावी. बिंदूनामावलीसाठी या माहितीची आवश्यक आहे. यामुळे त्याबाबत त्वरित माहिती एकत्र करा. शहरात २३ प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा, १२ मराठी शाळा, १० उर्दू शाळा व एक हिंदी शाळा आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत ५ शिक्षक कार्यान्वित आहेत.