⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | एकनाथराव खडसेंचा मुक्ताईनगरात भोई समाजातर्फे निषेध!

एकनाथराव खडसेंचा मुक्ताईनगरात भोई समाजातर्फे निषेध!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील छोटू भोई हे भोई समाजाचे उदयन्मुख नेतृत्व आहे. त्याला राजकीय विरोध म्हणून राजकीय षडयंत्र करीत खोटे गुन्ह्यात अडकवून राजकीय जीवनातून व वैयक्तिक जीवनातून संपवण्याचा कट राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला असून त्याच्या निषेधार्थ येथील तहसीलदारांना तालुक्यातील भोई समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते छोटुभाऊ बाबुराव भोई हे शिवसेनेत कार्यरत असले, तरी ते एक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत. ते वीस वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत आहेत आणि गेल्या १० ते ११ वर्षापासून शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणूनही काम करीत आहेत. भोई समाजासारख्या अतिशय छोट्या समूहातून ते येतात आणि सर्व वंचीत घटकांना जवळ करून त्यांच्यासाठी नेहमी धडपडत असतात. तसेच ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून भोई समाजाचे तालुकाध्यक्ष म्हणून समाजकार्य सुध्दा कार्य करीत आहे. त्यांच्या बाबतीत आणि एकूणच कार्यपध्दती बाबत कुणाची काही एक तक्रार नसतांना केवळ राजकीय आकसातून माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे सातत्याने दबावतंत्र वापरून त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचून छोटू  भोई व समाज बांधव यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे नोंदवून त्यांना बदनाम करीत आहेत.

दरम्यान, पर्यायाने त्यांच्या सकट समस्त भोई समाजाला बदनाम करीत असल्याचे दिसून येत आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना सहभाग नोंदवण्याचा अधिकार राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  राज्यघटनेच्या माध्यमातून दिला आहे. राजकरणात मतभेद असू शकतात. मात्र एखाद्या सर्व सामान्य आणि वंचीत घटकातून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला खोटया गुन्ह्यात अडकवून त्याचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे प्रयत्न करणे, हे निषेधार्ह आहे. तरी छोटु भोई यांच्या विरुद्ध माजी मंत्री व विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी चालविलेल्या षड्यंत्राची दखल घेऊन पर्यायाने भोई समाजाची बदनामी थांबवावी, अन्यथा भोई समजाला देखील आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. तसेच सदरील प्रकारणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर भोई, संजय भोई, मधुकर भोई, अशोक भोई, बाळू भोई, विशाल भोई, गणेश भोई, अमोल भोई, ओखा भोई, प्रवीण भोई, शुभम भोई, पवन भोई, लक्ष्मण भोई, बंडू भोई, विनोद भोई, चेतन भोई, मनोज भोई, रोहन भाई, रितेश भोई, सतीश भोईसह असंख्य भोई समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह