जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या चाळीसगावात राष्ट्रवादीकडून तहसीलदार व शहर पोलीस निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
ओ.बी.सी. राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी भाजपाच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता, त्या दरम्यान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. म्हणजे “तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा” असे आक्षेपार्ह विधान करुन आ. पाटील यांनी नारी शक्तीला खालच्या पातळीचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा महाराष्ट्र मासाहेब जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचा आहे. त्यांचाच वारसा अतिशय सक्षमपणे सुप्रियात सुळे या चालवित आहेत. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवान पाटील, शहर अध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक दीपक पाटील, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, सदाशिव गवळी, अनिल जाधव, युवक तालुका अध्यक्ष मोहित भोसले, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष भय्यासाहेब पाटील, योगेश पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष धनंजय देशमुख, टोनू राजपूत, दीपक कच्छवा, सारदारसिंग राजपूत, रमेश आगोने, भीमा गवळी, भय्या महाले, प्रताप पाटील, योगेश तुपे, सुरेश पगारे, महेश चव्हाण, आकाश पोळ, प्रवीण जाधव, प्रकाश पाटील, भाऊसाहेब पाटील, चेतन वाघ, कुणाल पाटील, दुर्गेश जाधव, सुजित पाटील, राकेश राखुंडे, कचेश्वर सोनवणे, निखिल देशमुख, मंगेश वाबळे, शुभम गवळे, सचिन सोनार, गौरव पाटील, राकेश चव्हाण, सुरज शर्मा, साहिल अव्हाड, कौस्तुभ ठाणगे, लेवेश राजपूत उपस्थित होते.