वकील हल्ल्याप्रकरणी जिल्हा वकील संघातर्फे निषेध

एप्रिल 28, 2022 4:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथे अँड .सुभाष खैरनार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जळगाव जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध करण्यात येऊन जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन सादर करण्यात आले.

निषेध

या प्रकरणी किसन सांगळे विरुद्ध पोलिसांत कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. गुरुवारी अर्धा दिवस न्यायालय बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी अँड. दिलीप बोरसे, अँड.प्रभाकर पाटील, अँड.शरद न्हायदेे, अँड. प्रकाश पाटील, अँड भरत देशमुख, अँड. दर्शन देशमुख, अँड.केतन ढाके,अँड.प्रवीण जंगले, अँड. वैशाली बोरसे, अँड. स्वाती निकम, अँड. हर्षल राजपूत आदींनी निवेदन देताना केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now