जळगावात घरफोड्या थांबेना ! कॅनडात मुलाकडे गेलेल्या वृद्धाचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरी

जुलै 24, 2025 12:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत असून चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. अशातच पत्नीच्या निधनानंतर कॅनडातील मुलाकडे गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या बंद घरातून सव्वा लाखांचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीत घडली. त्यांचा भाऊ घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत.

chalisgaon gharfodi 44 thousand

ईश्वर कॉलनीचे शब्बीर बदामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते चार भाऊ एकाच अपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांचे दुसरे बंधू फकरोद्दीन बदामी हे त्यांची पत्नी वारल्याने दोन महिन्यांपासून कॅनडात मुलाकडे आहेत. त्यामुळे त्यांचा फ्लॅट दोन महिन्यांपासून बंद होता. २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता शब्बीर नेरी येथे एका कामासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना त्यांची वहिनी तरिलग बदामी यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, फकरोद्दीन – बदामी यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा आहे. शब्बीर हे दुपारी २.४५ वाजता घरी पोहोचल्यावर त्यांना घरच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ कॅनडातील भावाला फोन करून याबाबत माहिती दिली.

फकरोद्दीन यांनी कपाटातील दागिने आणि रोकड तपासण्यास सांगितले असता कपाटात ठेवलेले ४५ हजार रुपये किमतीचे १०-१० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे शिक्के, १५ हजार रुपये किमतीची २ ग्रॅमची सोन्याची चेन, १५ हजारांचे ३ ग्रॅमचे सोन्याचे शिक्के आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे निष्पन्न
झाले. एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐक्ज चोरट्यांनी लंपास केला होता. चोरी २१ जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक राहुल तायडे हे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now