⁠ 
रविवार, मे 19, 2024

ब्रेकिंग : चाळीसगाव तालुक्यात खासगी बसला भीषण अपघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । खासगी ट्रॅव्हल्सला होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरूच असून अशातच एक मोठी दुर्घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ समोर आली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. सुदैवाने बस पलटी झाली त्याठिकाणी जास्त खोल भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र बसमधील तीन जखमी झाले आहेत.

याबाबत असे की धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान सकाळी बस मेहुणबारे (ता. चाळीसगाव) गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गावाजवळील गिरणा पुलाच्या जवळ जुन्या मोरावर बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली.

या झालेल्या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात बसमधील तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनचे विष्णू आव्हाड यांच्यासह टीमने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महामार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.