अमरावतीतून रजेवर आलेला कैदी पसार, पोलिसात गुन्हा दाखल!

जुलै 14, 2022 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । खुनाच्या गुन्ह्यातील रजेवर आलेला कैदी पसार झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

crime 6 jpg webp

दीपक उर्फ गोलू आनंदा तायडे (पातोंडी, ता.रावेर) असे पसार कैद्याचे नाव आहे. संशयीत दीपक तायडेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर अमरावती कारागृहात हलवण्यात आले होते मात्र कोरोना काळात त्यास रजेवर सोडण्यात आले मात्र रजेचा कालावधी पूर्ण होवूनही तो न परतल्याने त्यास पसार घोषित करण्यात आले. अमरावती कारागृहाचे शिपाई निना गणपतराव दांडगे यांच्या फियाृदीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अर्जुन दांडगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now