⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कासोदाच्या आरोग्य सेविकेची थेट पंतप्रधानांनी घेतली दखल!

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील प्रथमिक आरोग्य केंद्रातील फ्लोरेंस नाईटींगल पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका शोभा पाटील यांनी कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करणारे पत्र पाठवले आहे.

कामात सातत्य, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आदिवासी वस्तीत, काठेवाडी व ठेलारी हे भटकंती करणारे लोकांच्या वाड्यावस्त्यांवर जाऊन त्यांच्या मनातील गैरसमज भीती काढून तसेच गावातील शेतकरी व शेतमजूरांसाठी रात्री ९.००वाजेपर्यंत चौका चौकात कॅम्प घेऊन लसीकरणाच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करणार्या कासोदाच्या आरोग्य सेविकेची थेट पंतप्रधानांनी दखल घेतल्याचे पत्र त्यांना दि.२१रोजी प्राप्त झाले आहे.

दि. ८मार्च २०२१पासून सूरु झालेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्वात जास्त लसिकरण करणार्या आरोग्य सेविकांपैकी त्या एक आहेत. वरिष्ठांसह सहकारी व गावकऱ्यांकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.