---Advertisement---
बातम्या राष्ट्रीय वाणिज्य

ग्राहकांसाठी बॅड न्यूज! मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किमतीत १ फेब्रुवारीपासून वाढणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही पुढील महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या विविध मॉडेल्सच्या किमतीत वाढ होणार आहे. कंपनीने १ फेब्रुवारीपासून (February) वाहनांच्या किमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

maruti suzuki

कंपनीने स्टॉक एक्स्चेंज (stock exchange) फाइलिंगमध्ये स्पष्ट केले की, वाढत्या उत्पादन खर्चामुळे ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि खर्च ऑप्टिमाइझ करण्यासाठी काही भाग मार्केटमध्ये देणे आवश्यक आहे. यामुळे मारुती सुझुकीच्या विविध मॉडेल्सच्या किमती ३२,५०० रुपयांपर्यंत वाढणार आहेत.

---Advertisement---

कोणत्या मॉडेल्सच्या किमती वाढवणार?
सेलेरियो मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ३२,५०० रुपयांनी वाढणार आहे, तर प्रीमियम मॉडेल इन्व्हिक्टोची किंमत ३०,००० रुपयांनी वाढेल. कंपनीच्या सर्वात लोकप्रिय मॉडेल वॅगन-आर ची किंमत १५,००० रुपयांनी वाढेल, तर स्विफ्टची किंमत ५,००० रुपयांनी वाढेल. अल्टो K10 ची किंमत १९,५०० रुपयांनी वाढणार आहे, तर एसयूवी ब्रेझाची किंमत २०,००० रुपयांनी आणि ग्रँड विटाराची किंमत २५,००० रुपयांनी वाढेल.

याशिवाय, प्रीमियम कॉम्पॅक्ट मॉडेल बलेनोची किंमत ९,००० रुपयांनी, कॉम्पॅक्ट एसयूवी फ्रंटेक्स ची किंमत ५,५०० रुपयांनी, आणि कॉम्पॅक्ट सेडान डिझायरची किंमत १०,००० रुपयांनी वाढेल. मारुती सुझुकी सध्या एंट्री-लेव्हल अल्टो K10 (३.९९ लाख रुपयांपासून सुरू होणारी) पासून २८.९२ लाख रुपये किंमतीच्या इन्व्हिक्टो पर्यंत वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वाहने विकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---