जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । युपीमधील प्रयागराज येथे आज दि. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महा कुंभमेळा होत आहे. यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बलसाड ते दानापूर आणि वापी ते गया दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
बलसाड ते दानापूर कुंभमेळा विशेष ०९०१९ बलसाड – दानापूर ही गाडी बलसाड येथून १७, २१, २५ जानेवारी ८. १५, १९ आणि २६ फेब्रुवारी रोजी ०८.४० वाजता सुटेल व दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता पोहोचेल. ०९०२० दानापूर- बलसाड ही गाडी दानापूर येथून १८, २२, २६ जानेवारी तसेच ०९, १६, २० आणि २७ फेब्रुवारी रोजी २३.३० वाजता सुटेल व बलसाड येथे तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल.
या गाडीला नवसारी, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी. मिर्झापूर, चुनार, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा याठिकाणी थांबा असेल. वापी ते गया कुंभमेळा विशेष गाडी . ०९०२१ वापी – गया ही गाडी वापी येथून दि. १६, १८, २०, २२, २४ जानेवारी तसेच ७, १४, १८ आणि २२ फेब्रुवारी रोजी ०८.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता गया येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०९०२२ (गया वापी): ही गाडी १७, २१, २३, २५ जानेवारी तसेच ८, १५, १९ आणि २३ फेब्रुवारी रोजी २२.०० वाजता सुटेल व तिसन्य दिवशी १०.०० वाजता वापी येथे पोहोचेल. या गाडीला बलसाड, नवसारी, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बाबुवा रोड, सासाराम, डेहरी ओन सॉन आणि अनुग्रह नारायण रोड इथे थांबे असतील.