प्रशांत नाईक यांची दक्षता समितीवर निवड

मार्च 24, 2021 12:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । येथील महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांची राज्य शासनाच्या दक्षता समितीवर जळगाव तालुक्यासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील,  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केले आहे.

prashant naik

या समितीचे अध्यक्ष शहराचे आमदार सुरेश दामु भोळे हे असून सह अध्यक्ष आमदार चंदू भाई पटेल आहेत. तरी सदर उर्वरित 15 अशासकीय सदस्य मध्ये मेहरूण येथील नगरसेवक तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत सुरेश नाईक यांची शासनाने निवड केली आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ही दक्षता समिती काम करणार असून नागरिकांच्या अडचणी सोडविणे, नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणे असे  कार्य केले जाणार आहे. प्रशांत नाईक यांच्या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी तसेच त्यांचे मित्र परिवार व सर्वपक्षीय घटकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now