तरुण कुढापाचा स्तुत्य उपक्रम, महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार!
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील तरुण कुढापा मंडळातर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये निस्वार्थ व अविरतपणे सेवा देणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यालयात जाऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले असून, जनसेवेसाठी अधिकाधिक योगदान देऊ असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
जळगाव शहरात श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. यावेळी महावितरण विभागाने वीजपुरवठा सुरळीत ठेवत तसेच वीज पुरवठा नियमित राहण्याबाबत अविरतपणे योगदान दिले. अनेक अधिकारी व कर्मचारी तहान भूक विसरून काम करत होते. याबाबतची दखल तरुण कुढापा मंडळानी घेतली होती. या योगदानासाठी महावितरणच्या विविध शाखांमध्ये जाऊन तरुण कुढापा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये दीक्षित वाडी येथील मुख्य कार्यालयात कार्यकारी अभियंता व्ही बी पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारपात्रे, आणि सुरेंद्र डांगे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर सिंधी कॉलनी कार्यालयात उमेश घुगे, जोशी पेठ कार्यालयात उमाकांत पाटील, शनिपेठ कार्यालयात रोहित गोवे, पावर हाऊस कक्षामध्ये जयेश तिवारी, नवी पेठ कक्षामध्ये दीपक पाटील, मेहरूण कक्षामध्ये चेतन सोनार, आदर्श नगर कक्षामध्ये अश्विनी जयसिंगपुरे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, ऍड. मनोज पाटील, तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष हितेश वाणी, उपाध्यक्ष चेतन मराठे, कार्यकर्ते पंकज भावसार, शंभू भावसार, भैय्या ठाकूर, अनिल चौधरी, रवींद्र चौधरी, मुन्ना परदेशी, कुंदन चौधरी, शैलेश चौधरी, मुन्ना मराठे, प्रशांत कुवर, आप्पासाहेब चौधरी, सुमित सपकाळे, चेतन तायडे, सुमित कोळी, अनिल ठाकूर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.