जळगावात बंद घर फोडून ३१ हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून ३१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज गुरुवारी जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी आज जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत असे की, जळगाव शहरातील गणेश कॉलनीत भरत जनार्दन लढे (वय-६४) हे आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्यास आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी ते १८ जुलै रोजी कल्याण, मुंबई येथे नातेवाईकांकडे गेले. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. बंद घर झाल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील ३१ हजार रूपयांचा ऐवज लांबविला. 

त्यांच्या शेजारी राहणारे वृषाली विलास कोल्हे यांनी लढे यांच्या घराचे लॉक तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरात संपुर्ण सामान अस्तव्यस्त केलेला प्रकार काल उघडकीला आल. शेजारी राहणारे वृषाली कोल्हे यांनी भरत लढे यांना मोबाईलद्वारे चोरी झाल्याचे सांगितले. 

त्यानुसार लढे कुटुंबिया मध्यरात्री १ वाजता जळगावात दाखल झाले. आज गुरूवारी २२ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.