---Advertisement---
जळगाव शहर महाराष्ट्र

पोस्टरबाजी : प्रताप पाटील होणार जळगाव शहराचे भावी आमदार ?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रताप पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. या अनुषंगाने जळगाव शहरात भावी आमदार प्रताप पाटील असे बॅनर लागले आहेत. यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

pratap patil jpg webp webp

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांच्याकडे बघितले जाते. सध्या प्रताप पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. मात्र आता जळगाव शहरात त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागल्याने जळगावच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

---Advertisement---

सद्यस्तिथीत गेल्या २ टर्मपासून जळगाव शहराचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे आहेत. मात्र खुद्द पालकमंत्र्यांच्या मुलाचे बॅनर जळगाववात लागल्याने विविध चर्चा शहरात सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूक प्रताप पाटील हे जळगाव शहरातून लढतात का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

भाजप शिंदे गटाची राज्यात युती नक्की समजली जात आहे.अश्यावेळी भाजप जळगावची जागा सोडणार का हा प्रश्न आहेत. मात्र प्रताप पाटील भावी आमदारचे बॅनर लागल्याने एकच चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---