जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२६ । महाराष्ट्रातील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असणाऱ्या प्रलंबित १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना १५ दिवसांची मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने दिली आहे. या निवडणुका आता १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोगाला वेळ मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे. आयोगाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जळगावसह राज्यातील १२ जिल्हा परिषदेचा आजपासून बिगुल वाजणार आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक?
आज निवडणूकीचा कार्यक्रम प्रसिध्द होऊ शकतो. आजपासूनच आचारसंहिता लागू असेल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी – १९ जानेवारी ते २८ जानेवारी
नामनिर्देशनपत्रांची छाननी – २९-३० जानेवारी
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक – २ फेब्रुवारी
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक – ३ फेब्रुवारी
मतदानाचा दिनांक – १२ किंवा १३ फेब्रुवारी
मतमोजणी – १४ फेब्रुवारी २०२६










