जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२५ । हिंदी सिनेविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ आणि ‘प्यार का पंचनामा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा एका मोठ्या अपघाताला बळी पडली. तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.

करिष्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. तिने सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

अभिनेत्रीने काय म्हटले?
अभिनेत्रीने पोस्टमध्ये सांगितले की ‘काल शूटिंगसाठी चर्चगेला ट्रेनने जायचे ठरवले. मी साडी नेसली होती. मी ट्रेनमध्ये चढली त्यानंतर ट्रेन सुरु झाली. माझ्या लक्षात आलं की, माझ्या मित्रांनी ट्रेन पकडलीच नाही. त्यामुळे मी उडी मारली आणि पाठीवर पडले. माझ्या डोक्यालादेखील मार लागला आहे.’
अभिनेत्रीने पुढे लिहिले की माझ्या पाठीला दुखापत झाली आहे, माझे डोके सुजले आहे आणि माझ्या शरीरावर खोल जखमांच्या खुणा आहेत. डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून डोक्याला झालेली दुखापत गंभीर नाही हे कळेल. मला एक दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कालपासून मला वेदना होत आहेत, पण मी खंबीरपणे उभी आहे.












