⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

राजकीय घडामोडींना येणार वेग : राज्यपाल राजभवनात दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । राज्यातील राजकीय महानाट्य सुरु असताना आता या नाट्याला वेग येणार आहे. कारण राज्यपाल भगत सिंग कोषारी कोरोना मुक्त झाले असून लवकरच ते राजभवनात एन्ट्री घेणार आहेत. यानंतर वेगवान घडामोडी घडतील असे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह सोमवार पासून महाराष्ट्रात नाहीयेत. आधी ते सुरतला गेले तर नंतर ते गेले गुहाटीला त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता त्यांच्या समर्थकांचा आकडा वाढत जाऊन तो तब्बल ५० वर पोहचला आहे. यात शिवसेनेचे ४१ तर अपक्ष ९ आमदारांचा समावेश असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र २१ जूनच्या सकाळीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राज्यपाल कोश्यारी हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजभवनात दाखल होण्यार आहेत. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विशेष करून शिंदे गटातर्फे त्यांना अधिकृत पत्राच्या माध्यमातून नवीन गट स्थापनेबाबतची माहिती दिली जाऊ शकते. आधी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाला दणका दिल्याचे काम केले आहे. यानंतर आता राज्यपालांच्या हातात मोठे अधिकार असल्याने ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.