⁠ 
रविवार, मे 19, 2024

कासोदा पोलीस आवारातून डंपर पळविला, एक ताब्यात, एक फरार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । कासोदा ( ता.एरंडोल ) येथील पोलीस स्टेशन कार्यालयात
अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या डंपर चालकाची पोलीस ठाण्यात चौकशी सुरु असतांना त्यासोबत असलेल्या दुसर्‍याने पोलिसांसमोर पोलीस स्टेशन आवारातून वाळूने भरलेले डंपर पळवून नेल्याची घटना १९ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली.त्यानंतर काही अंतरावरून डंपर व तीन ब्रास वाळू असे अंदाचे ५ लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी गगन छगन तडवी याला अटक केली तर अमीन हुसेन शेख हा फरार झाला आहे. या दोघांवर पो.मनोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, दि. १९ रोजी रात्री १ वाजता पारोळा-फरकांडे चौफुलीवर पोलीस उपनिरीक्षक नरेश ठाकरे यांच्यासोबत पो.काँ.भागवत पाटील, इम्रान खान, स्वप्नील परदेशी, नितीन मनोरे हे गस्त घालत असतांना त्यांनी अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या डंपर क्र.(एमएच २० सीटी ९२८४) हा आडवून चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तर दिली. त्या संशयावरून पोलीस ठाण्यात डंपर जमा करून पुढील तपासकामी गगन छगन तडवी याची चौकशी सुरू असताना त्यासोबत असलेल्या अमीन हुसेन शेख रा.उत्राण याने डंपर पोलीस स्टेशन आवारातून पळवून नेला. दरम्यान, तळई रस्त्यावर हाॅटेल सत्कार समोरील बेकरीच्या मागे वाळू खाली करीत असताना पोलीस पोहचत असल्याचे पाहून डंपर सोडून पळ काढला.त्यानंतर डंपर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पाच लाख किंमतीचे डंपर व अंदाजे बारा हजार रुपयांपर्यंत असलेली तीन ब्रास वाळू असे जमा करण्यात आले. या प्रकरणी गगन छगन तडवी (वय २०,रा.मोलगी ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार ) हल्ली मुक्काम निलाॅन्स कंपनी काॅलनी, व अमीन हुसेन शेख रा.उत्राण या दोघांवर पो.काँ.नितीन मनोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी गगन छगन तडवी यास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी अमीन हुसेन शेख हा फरार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश ठाकरे हे करीत आहे.

हे देखील वाचा :