⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जामनेरच्या सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जामनेरच्या एसआरपीएफ (SRPF) जवानाने राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली.

प्रकाश कापडे हे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. पण आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. गेली पंधरा वर्षा पासून ते एसआरपीएफ मध्ये कार्यरत होते.

दरम्यान, आज बुधवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यावेळी घरातील सर्व जण झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पंचनामा सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. तपास सुरू असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल असे पोलीस म्हणाले.

यापूर्वी प्रकाश कापडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.