जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश

मे 10, 2026 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२६ । जळगाव शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाण असलेल्या टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. या धाडसी कारवाईमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

raid

नेमकी घटना काय?

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाला गुप्त बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली होती की, टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजवर काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबी आणि एचटीयू च्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

‘डमी’ ग्राहकाद्वारे रचला सापळा

पोलिसांनी या कारवाईसाठी अत्यंत गोपनीय नियोजन केले होते. माहितीची खात्री करण्यासाठी पथकाने प्रथम एका ‘डमी’ ग्राहकाला संबंधित लॉजवर पाठवले. तिथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच, डमी ग्राहकाने इशारा केला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या एलसीबी आणि एचटीयूच्या पथकाने लॉजवर झडप घातली.

या छाप्यात देहविक्रय रॅकेट रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी या व्यवसायात गुंतलेल्या लॉजचा व्यवस्थापक आणि दलालांना (एजंट) तात्काळ ताब्यात घेतले आहे. तसेच, या रॅकेटमध्ये अडकलेल्या पीडित महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या सेक्स रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत पसरली आहेत आणि यात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. ​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडक कारवाईमुळे जळगाव शहरातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात कुठेही असे गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईत यांचा होता सहभाग?

प्रोफेशनरी डीवायएसपी दरेकर, पीएसआय शेखर डोमाळे, एलसीबी सुनील दामोदर, संदीप चव्हाण, अश्विनी सावकारे, विद्या सोनार, रूपाली खैरे, एलसीबी पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, रवींद्र पाटील, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, संजय हिवरकर, सलीम शेख, हवालदार विजय पाटील, जितेंद्र पाटील, भूषण कोल्हे, महिला पोलीस साधना शिंदे, वहिदा तडवी, अर्चना कर्डेकर सर्व नेमणूक एएचटीयू

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now