अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, ३१ हजारांचा मद्यसाठा जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । भुसावळ, चाेरवड शिवारातील भागाई हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विक्री होत असल्याची कुणकुण लागताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने सोमवारी रात्री १० वाजता कारवाई केली. त्यात ३१ हजार रूपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला.

crime 2022 06 08T094346.775

भागाई हॉटेलमधून अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती डीवायएसपी वाघचौरे यांना मिळाली. त्यांनी सपाेनि हरिश भाेये, नंदकिशाेर साेनवणे, रमण सुरळकर यांना कारवाईची सूचना केली. या पथकाने दोन पंच सोबत घेत रात्री १०.०५ वाजता छापा टाकला. हाॅटेलच्या मागील एका खोलीत दारूच्या बाटल्या सापडल्या. निवृत्ती नामदेव पवार यास ताब्यात घेत मद्यसाठा जप्त करण्यात अाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now