⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

रवंजे बुद्रुकमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई, जुगाराच्या साहित्यासह रोकड जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । एरंडोल पोलिसांच्या हद्दीतील रवंजे बुद्रुक येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. यात जुगाराच्या साहित्यासह रोकड जप्त करण्यात आली.

एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील काशिनाथ पाटील व हेडकॉन्स्टेबल राजेश पाटील यांच्या पथकाने २मे २०२२ रोजी रवंजे बुद्रुक येथे समाज मंदिरानजीक झन्ना मन्ना नावाच्या जुगारावर छापा टाकला. या धाडीत आरोपींकडून पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह दोन हजार वीस रुपये रोकड हस्तगत केली. एरंडोल पोलिसांच्या या कारवाईमुळे अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त पत्त्यांचे जुगार खेळण्याच्या वाढत्या प्रकारास काही प्रमाणात का होईना आळा बसला आहे.