जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

जिल्ह्यात या ठिकाणी मिळाली पोलिसांना इ – बाईक : राज्यातील पहिलाच प्रयोग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून पोलीस विभागाला सात ई- बाईकचे वितरण शनिवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. आमदार निधीतून पोलिस विभागाला ई बाईक देण्याचा हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

भुसावळातील शहर, बाजारपेठ आणि तालुका या तिन्ही पोलीस ठाण्यांना स्थानिक आमदार विकास निधीतून ई – बाईक चे वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, तालुका ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योगपती व नगर माजी नगरसेवक मनोज बियाणी, महेंद्रसिंग ठाकूर, अजय नागराणी आदी उपस्थित होते. आमदार संजय सावकारे व जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते उपविभागात येणार्‍या पोलीस ठाण्यांतील अधिकार्‍यांकडे ई -बाईक सुपुर्त करण्यात आल्या.

चौकशीकामी ठाणे अंमलदारांना खूप फिरावे लागते. याचबरोबर गेल्यावर्षी एक हजार 200 गुन्ह्यांची नोंद या विभागात झालेली आहे त्यामुळे गस्ती साठी बाईकची खूप मोठी गरज होती तसेच शहरात 220 आरएफआयडी पॉईंट लावलेले आहे. कमी खर्चात हा चांगला उपक्रम असून यामुळे गस्तीचे प्रमाण वाढून निश्चितच अप्रिय घटनांना आळा बसेल, असा विश्वास यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला.

भुसावळ शहर हे पूर्वी क्राईम सिटी म्हणून ओळखले जायचे. बाहेरील येणारे लोकही घाबरत होते. आता गुंडगिरी व गुन्हेगारी बर्‍याच अंशी कमी झाली आहे. गस्तीसाठी स्वस्त इलेक्ट्रॉनिक बाईकचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मांडला होता. गेल्या वर्षभरापासून या प्रक्रियेसाठी अनेक मंजुर्‍या घ्याव्या लागल्या. पोलीस विभागाला आमदार निधीतून ई – बाईक देण्याचा राज्यातील हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. आता भुसावळ पॅटर्न राज्यभरात राबवले जाईल, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button