जळगाव जिल्हा
गया ते मुंबई दरम्यान धावणार नवीन एक्स्प्रेस; जळगाव, भुसावळात असेल थांबा
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । दिवाळीदरम्यान अनेक जण कुटुंबियांसह गावी जातात. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. प्रवाशांसाठी रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वेकडून विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यातच गया ते मुंबई दरम्यान नवीन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजेच या गाडीला भुसावळ, जळगाव येथे थांबा दिला आहे.
रेल्वे क्रमांक २२३५७ एलटीटी ते गया साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस २५ ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १.१५ वाजता सुटेल. रेल्वे क्रमांक २२३५८ गया ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २३ ऑक्टोबरपासून दर बुधवारी गया येथून सायंकाळी ७ वाजता सुटेल.