जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यात ‘लॉकडाऊन’नंतर पहिल्यांदाच भाेरस येथील शांतीदेवी चव्हाण तंत्रनिकेतन, येथील उमंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था व फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित महा नोकरी मेळाव्यात तब्बल २०० तरुणांना रोजगार देत “ऑन दि स्पॉट” नोकरीचे नियुक्ती पत्र दिले.

या प्रसंगी संस्थेच्या संचालिका तथा संस्थापक अध्यक्ष संपदा पाटील, मुख्य समन्वयक प्रशांत वाघ, प्राचार्य दीपक पाटील, उपप्राचार्य नितीन बागुल, संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्यास सकाळपासूनच बेरोजगार तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

माैखिक व लेखी परीक्षेद्वारे १८८ तरुणांची निवड
उत्तर महाराष्ट्रात नावाजलेल्या संस्थेने मेळावा आयोजित केल्याने मुलाखतीसाठी तब्बल ३४५ उमेदवार उपस्थित होते. शिस्तबद्धरीत्या त्यांची मौखिक व लेखी परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यांना विविध कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १८८ उमेदवारांची निवड करुन त्यांना जागेवर नियुक्ती पत्र दिल्याने या तरुणांनी संयोजकांचे आभार मानत नोकरीची संधी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी संपदा उन्मेष पाटील यांच्या हस्ते या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






