⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल मधील दोन विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. त्यानुसार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल पुणे येथील सुंदरी एस बी व रवींद्र कोलापटे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सुंदरी ही अनाथ संवर्गातील आरक्षणातून पोलीस उपनिरीक्षक होणारी पहिलीच तरुणी असणार आहे.

सुंदरी मुळची पुण्याची असून लहानपणीच तिचे आई वडील वारले होते. नंतर हॉस्टेल मध्ये राहून तिने शिक्षण पूर्ण केलं. पुढे २०१८ पासून दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल पुणे प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे मार्गदर्शन ती घेत आहे. तसेच रवींद्र कोलापटे या विद्यार्थ्यांची सुद्धा लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली आहे. रवींद्र हा २०१९ पासून दीपस्तंभ मनोबलच्या प्रकल्पात स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेत होता. रवींद्र हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे या गावाचा रहिवासी असून त्याचे आई वडील मजुरी करून कुटुंबाचा उदार निर्वाह करतात.

दीपस्तंभ मुळेच मला माझे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग गवसला. माझ्या सारख्याच अनाथ भावा बहिणीसाठी मी कायमच दीपस्तंभ सोबत असेल अशा भावना सुंदरीने व्यक्त केल्या. तर आपल्या भावना व्यक्त करताना रवींद्र म्हणाला माझी स्वप्न खूप मोठी होती पण आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती त्यामुळे मार्ग सापडत न होता. पण दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पामुळे माझ्या स्वप्नांना बळ मिळले आणि आज हे यश मला मिळाले आहे. भविष्यतही मी माझ्या या परिवार सोबत कायम असेल.

महाराष्ट्रातल्या १८ वर्षावरील अनाथ, दिव्यांग व वंचित विदयार्थ्यांसाठी दीपस्तंभ मनोबल मध्ये २०१४ पासून निवासी प्रशिक्षण सुरु केल आहे. शासनाने एक टक्का आरक्षण दिलेल आहे. मात्र त्याचा फायदा होण्यासाठी या विध्यार्थ्याना गुणवत्तेच निवासी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ती गरज महाराष्ट्रातल्या अनाथ विदयार्थ्यांसाठी दीपस्तंभ भागविण्याचा प्रयत्न करत आहे. या सोबतच शिकण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती आहे पण परिस्थिती नाही आहे. अश्या विध्यार्थ्यांना मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयन्त दीपस्तंभ करीत आहे. सुंदरी आणि रवींद्र अत्यंत गुणी आणि मेहनती मुल आहेत. त्यांना मिळालेल्या यशा बद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन. या यशात सर्वात महत्वाचा वाटा त्यांनी सातत्याने केलेल्या कष्टाचा आहे असे प्रतिपादन दीपस्तंभचे प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.