पोलिसांची धडक कारवाई : तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा पकडला

एप्रिल 5, 2022 3:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । पोलिसांना एका कंटेनरवर संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता. चक्क त्यात अंदाजे १ कोटीचा गुटखा आढळुन आला आहे. ही धडक कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केली असून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल करणे सुरु आहेत.

crime 20

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करत कंटेनरची अधिक तपासणी केली असता. त्यात गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. दरम्यान त्या कंटनेरमध्ये अंदाजे एक कोटीचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. (एचआर ३८ एबी ६०९६ ) असे पकडलेल्या गाडीचा क्रमांक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now