⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

पोलिसांची धडक कारवाई : १० डंपर जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । शहरातील वेगवेगळ्या भागात वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपरांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यात आली. पोलीसांनी यावेळी १० डंपर जप्त केले. याप्रकरणी शनीपेठ, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीसात वेगवेगळॆ गुन्हे दाखल करण्यात आले.

आकाशवाणी चौकातून ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारासे पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना विनाकंमांकाचे तीन डंपरमधून बेकायदेशीर वाळू वाहतूक करतांना पोलीसांनी पकडले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानुसार पोलीसांनी वाहने जप्त केली आहे. याप्रकरणी पोहेकॉ फिरोज तडवी यांच्या फिर्यादीवरून देविदास नवल रायसिंग रा. बांभोरी ता. धरणगाव, प्रमोद भिमराव नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव, सतिष लक्ष्मण महाजन रा. शनीपेठ, संतोष शालक नन्नवरे रा. बांभोरी, आणि ज्ञानेश्वर श्रावण नन्नवरे रा. जळगाव या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील राष्ट्रीय महामार्गावर रामानंदनगर पोलीसांनी धडक कारवाई करत वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच १९ सीवाय ५९१५) पकडले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवानगी नसतांना आढळून आले आहे. पोलीसांनी वाळूचे जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितेश बच्छाव यांच्या फिर्यादीवरून सैय्यद अशफाक सैय्यद शफी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव आणि अभय हरी परदेशी रा. भडगाव जि.जळगाव या दोन्ही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्याच प्रकारे जळगाव शहरात अजून काही ठिकाणी कारवाई करण्यात आली यावेळी अजून एकही गुन्हे दाखल करण्यात आले.