अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई

एप्रिल 15, 2022 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। १५ एप्रिल २०२२। वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime ३

पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर येथे गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता पोलिसांची गस्त सुरु असताना त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीव्ही ४०६) आणि विना क्रमांकाच्या ट्रॉलीमध्ये वाळू वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश महादू गोपाळ (वय-२७) रा. पारस नगर आणि ज्ञानेश्वर सदाशिव मुलमुले (वय-२८) रा. पार्वती नगर जळगाव या दोघाण विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक देवानंद साळुंखे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now