---Advertisement---
वाणिज्य

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! PM किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याबाबत आली ‘ही’ मोठी बातमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. गेल्या महिन्यात पीएम मोदींनी पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले होते. त्यानंतर आता 13 व्या हप्त्याचे (PM Kisan Yojana 13th installment) पैशे कधी खात्यात येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागू आहे. अशातच 13 वा हप्ता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

pm kisan

पीएम किसान योजना केंद्र सरकार राबवत असलेली ही योजना सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेबाबत स्वत: पंतप्रधान मोदींनी अनेक मंचांवर शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी ट्विट करून म्हटले होते की, ‘देशाला आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. ते जितके बलवान असतील तितका नवीन भारत समृद्ध होईल. मला आनंद आहे की पीएम किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकर्‍यांना नवीन बळ देत आहेत.

---Advertisement---

तेराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?
पीएम किसानचा पुढील हप्ता लवकरच येत आहे. वास्तविक, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. त्यानुसार पीएम किसानचा 13 वा हप्ता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

तुमचा अर्ज अपडेट करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर ती लवकर सोडवा.
यासाठी हेल्प लाइन नंबरवर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता.
पीएम किसानचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधला जाऊ शकतो.
तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर पाठवू शकता.
तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करा.

याप्रमाणे तुमची हप्त्याची स्थिती तपासा
हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
आता Farmers Corner वर क्लिक करा.
आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---