जळगाव, भुसावळसह १० रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर बंदी ; कारण काय?

डिसेंबर 5, 2025 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२५ । भारतात बहुतांश लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. कारण रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि सुरक्षित मानला जात असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये देखील गर्दी दिसून येते. दरम्यान भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

train ticket

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांची रेल्वे स्थानकांवर गर्दी होते. स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने दहा रेल्वे नकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये जळगाव, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक व वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्यासाठी या निर्बंधांमधून सवलत दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now