जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताई-भवानी अभायारण्यातील डोलारखेडा वनपरीमंडळ येथील वनकर्मचारी निवास्थान आवारात २०० स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली. वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
वनपाल डी.जी. पाचपांडे, वनरक्षक जी.बी. गोसावी, वन समिती अध्यक्ष विनोद थाटे, पुंडलीक पाटील, महेंद्र गरुड, विनोद भोई, हर्षल पाटील, वनमजुर संजय सांगळकर, तुकाराम गवळी, अशोक पाटील, योगेश कोळी, वाहनचालक महेंद्र पुरकर, सुरेश महाले, वनमजुर सिद्धार्थ थाटे यांनी परिश्रम घेतले. यात सुमारे दोनशे हुन अधिक स्थानिक विविध जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावेळी वनाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.