⁠ 
शनिवार, मे 4, 2024

एरंडोलला क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेत विविध खेळांचे नियोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा येथील गट साधन केंद्रात होऊन २०२२ – २३ या वर्षाच्या तालुकास्तरीय शालेय स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन हे होते.

शालेय स्पर्धांचे स्थळ व तारखा निश्चित करण्यात आल्या एरंडोल तालुका क्रीडा समन्वयक प्रा. मनोज पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महाजन यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रा. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. के. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिन महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. या सभेस के.के. पवार, प्रदीप देसले, एम. एम. राठी, प्रमोद पाटील, सुरेश महाजन, के. डी. पाटील आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.