उन्हाळी गर्दीसाठी जादा बसचे नियोजन

जळगाव लाईव्ह न्युज | २३ एप्रिल २०२२ । उन्हाळी गर्दीच्या हंगामसाठी जादा वाहतुकीचे आदेश विभाग निहाय देण्यात आलेले आहे. प्रस्तावानुसार वाहतूक आदेश काढण्यात आलेले आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामात वाहतूक अत्यंत काळजीपूर्वक व अभ्यास करुन पुर्व नियोजनाने चालवणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.या मुळे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

Covid-19 प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक चलणीय स्थिती पूर्णपणे विस्कटली यामुळे त्याचा अनिष्ट परिणाम महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. तसेच ऑक्टोबर २०१९ पासून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या अघोषित संप मुळे राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक काही काळ पूर्णतः बंद झाल्याने त्याचा देखील विपरीत परिणाम वाहतूक चलनावर झालेला असून प्रवासी मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन सेवेपासून दुरावलेले आहेत. १ एप्रिल पासून करोणाचे सर्व निर्बंध शासनाने शिथिल केले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बहुतांश कर्मचारी सेवेत हजर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महामंडळाचे वाहतूक पूर्वस्थितीत आणण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करणे आवश्यक आहे. २२ एप्रिल ते १५ जून या उन्हाळी हंगामात प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व फेर्यांची वाहतूक कार्यान्वित करण्यासाठी बस स्थानकावरील प्रवाशांच्या माहितीसाठी असलेल्या सूचनाफलकावर सदर फेर्यांची माहिती प्रदर्शित करण्यात यावी, तसेच स्थानिक माध्यम मध्ये व इतर समाज माध्यमांद्वारे उन्हाळी जादा वाहतुकीबाबत प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त किमी उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या फेऱ्या कोणत्याही विभागात आगाराच्या फेरी समांतर धावणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, जेणेकरून दोन्ही घटकांच्या उन्हाळी हंगामातील फेऱ्या चलनात राहतील, वाहतुकीची फेरी निहाय प्रत्येक दशका खेरीज या कार्यालयास स्वतंत्ररीत्या ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे उपमहाव्यवस्थापक मुंबई यांच्याद्वारे विभागास कळविण्यात आले आहे. तसेच उन्हाळी हंगामात जादा वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मार्गस्थ बिघाड होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अन्यथा आगाराच्या बसेस आगारात पडून असल्यास त्यांचा वापर करण्यात यावा मात्र सदर बसेस नियतन वर वेळेवर व सुरक्षित उपलब्ध होतील याची दक्षता घेण्यात यावी, हंगामातील सर्व फेऱ्या फायद्याचाच चालला पाहिजे हंगामात जादा वाहतूक तोट्यात चालू राहिल्यास त्यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक यांना जबाबदार धरण्यात येईल आगारातील सर्व चालक-वाहकांना किमान उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात यावे कमी भार मनाच्या फेऱ्या तात्काळ स्थगित कराव्यात जास्तीत जास्त बसेस मार्गास गावातील मार्गस्थ बिघाड व रद्द करण्याचे प्रमाण कमी कमी राहील याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी यासह अन्य सूचना प्रत्येक विभागाला करण्यात आल्या आहेत.