⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | पिंप्रीसेकमच्या शेतकरी आंदोलकांची आ. सत्यजीत तांबेंनी घेतली भेट

पिंप्रीसेकमच्या शेतकरी आंदोलकांची आ. सत्यजीत तांबेंनी घेतली भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२३ । रब्बी हंगाम सुरू असून शेतीसाठी होणारे भारनियमन रद्द करण्यासाठी भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत व त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला तोंड द्यावे लागत असून तात्काळ भारनियमन रद्द करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ह्या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत.

मुक्ताईनगरात पुन्हा लाखोंचा अवैध पानमसाला पकडला

पिंप्रीसेकम संघर्ष समितीच्या वतीने आमदार सत्यजीत तांबे यांना एक निवेदन देखील देण्यात आले आहे. सदर निवेदन पत्रात पिंप्रीसेकम गाव पूरग्रस्ताच्या यादीत येत असून गावाला भविष्यात गावठाण विस्ताराकरीता गट नं. २०५ हि मिळकत गावठाणाकडे वर्ग करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात आले असूनदेखील ते अद्याप प्रलंबित आहे. तसेच दिपनगर महानिर्मिती प्रशासन यांनी पिंप्रीसेकम गाव दत्तक गाव म्हणून जाहीर करावे व मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सोबतच गावातील विद्यार्थ्यांना स्कूल बसची व्यवस्था करून देण्यात यावी व प्रकल्पग्रस्तांना त्वरीत रोजगार मिळावा अश्या अनेक मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

पिंप्रीसेकम येथील रहदारीच्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणून या वाहनांना सदर रस्त्यावरून वाहतुकीसाठी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. तसेच दिपनगर प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे गावकऱ्यांच्या जमिनींच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. सोबतच गावाच्या समस्यांबाबत पुकारलेल्या या आंदोलनामुळे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अश्यादेखील मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

IDBI बँकेत तब्बल 1036 पदांवर भरती

महानिर्मिती व महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर भारनियमन तत्काळ रद्द होण्यासाठी प्रयत्न करणार व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार सत्यजीत तांबे यांनी सदर आंदोलनकर्त्यांना दिले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.