जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स २ के २५ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स २के२५ (टेक्निकल इव्हेंट) उत्साहात संपन्न झाला.

फिनिक्स २ के २५ हा टेक्निकल इव्हेंट असून यात कोड रश, कॅड क्लॅश, क्विझ स्टार, चाट ऑन जीपीटी, इक्वेशन मेनिया, रीक्रिएशन, रिल स्टार व फ्री फायर अशा प्रकारचे इव्हेंट्स होते.कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) हे हर्ष कुमार त्रिपाठी (एअरपोर्ट डायरेक्टर, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया जळगाव),देवेंद्र दंडगव्हाळ (डेप्युटी सेक्रेटरी, आरबीटीई, छत्रपती संभाजी नगर रिजन) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. प्रवीण फालक (उपप्राचार्य), प्रा. दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन), फिनिक्स कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मयूर ठाकूर व सर्व विभाग प्रमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयामध्ये २२ वर्षापासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे हे नमूद केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हर्ष कुमार त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट चाकोरी मध्ये न राहता किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न बाळगता नवीन प्रकारचे ज्ञान घ्यावे, जेणेकरून या ज्ञानाचा उपयोग बाहेरील जगात त्यांना करता येईल. देवेंद्र दंडगव्हाळ यांनी चिकाटीने कोणतीही गोष्ट साध्य होते हे नमूद केले.शैक्षणिक घडामोडी व कामकाजामध्ये विद्यार्थ्याला प्राथमिकता देणे गरजेचे आहे व ज्या वेळेस विद्यार्थी योग्य पद्धतीने करिअरची वाटचाल करतो तेव्हा त्याला काम करण्याचे समाधान होते. महाविद्यालयातील वेळ हा खरा गोल्डन असतो.
या वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करायला हवा.डॉ. वैभव पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या दैनंदिन गरजा ओळखून त्याप्रमाणे नियमावली करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचे महत्व कळेल व वेळ वाया जाणार नाही नवनवीन संकल्पना जागतिक स्तरावर आपले महत्त्व सिद्ध करीत आहेत. त्या संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. बाहेरील जगाला ज्या कलागुणांचे अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असते ते कला गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे असते. फिनिक्स २०२५ या कार्यक्रमांमध्ये ६०० च्या वर प्रतिस्पर्धींनी सहभाग नोंदविला. या टेक्निकल इव्हेंट मध्ये जळगाव जिल्हा तसेच जवळील परिसरातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये सहभाग नोंदविला होता.बक्षीस वितरण समारंभबक्षीस समारंभाला फिनिक्स २घ२५ या कार्यक्रमाचे प्रायोजक पॅशन सॉफ्टवेअर जळगाव, किरण अकॅडमी पुणे, सॉफ्टेड कॉम्प्युटर व इलेक्ट्रोसॉफ्ट यांची उपस्थिती होती.मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषिक २००० रुपये व द्वितीय पारितोषिक १००० रुपये तसेच तृतीय पारितोषिक ट्रॉफी असे बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.त्याच सोबत विजेता विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग वर आधारित पुस्तक म्हणून पारितोषिक देण्यात आले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉक्टर वर्षा पाटील मॅडम (सचिव) डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. अनिकेत पाटील सर यांनी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळजा महाजन, निलाक्षी बर्डे,हेमांगी बावा व तरन्नुम पिंजारी या विद्यार्थिनींनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मयूर ठाकूर तसेच सर्व कमिटी मध्ये असलेले शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.